
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटातील बडा नेता ठाकरे यांच्या शिवसेनेत, कोकणात अजित पवारांना धक्का
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Assembly Election 2024 पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. अनेक नेते स्वघरी परतण्याच्या मार्गावर असताना गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत Thackeray group नेतेमंडळींचा आणि मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांचा इन्कमिंगचा जोर वाढला आहे. अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाचे मोठा नेता शिवसेना ठाकरे गटात सामील झाला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला कोकणात धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.



शिवसेनेत यापूर्वी कोकणातून माजी आमदार आणि भाजप नेते राजन तेली यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर कोकणातील माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा घर वापसी करून कोकणात ठाकरे गट मजबूत झाला असल्याचे पाहायला मिळत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे कोकणात शिवसेनेचे प्राबल्य वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.