क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News : बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन व पैसे लुटणा-या गुन्हेगारांना कोंढवा तपास पथकाने केले जेरबंद

कोंढवा पोलीसांची कारवाई ; शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींना केले अटक, एकुण 05 जबरी चोरीचे गुन्हे केले उघड. Pune Kondhwa Police News

पुणे :- बोपदेव घाटामध्ये Saswad – Bopdev Ghat शस्त्राचा Weapon धाक दाखवून मोबाईल फोन व पैसे लुटणा-या गुन्हेगारांना Criminal कोंढवा तपास Pune Kondhwa Police पथकाने अटक केले आहे. धारदार शस्त्राने धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केले आहे.एकुण 05 जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यास कोंढवा पोलीसांना यश आले आहे‌. 21 एप्रिल रोजी रात्री 2.30 वा चे सुमारास फिर्यादी आशुतोष संजयकुमार राज, (22 वर्षे) धंदा शिक्षण, रा. साईधाम अर्पाटमेंट, तीसरा मजला क्राऊन बेकरी समोर, त्रिमुर्ती चौक, पुणे हे त्यांच्या मित्र नामे आयान श्रिवास्तव, अनिकेत कुमार, आनंद राज याचे सह बोपदेव घाट येथील टेबल पॉटवर, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे येथे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून दोन दुचाकी गाडी यावरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून तसेच हाताने मारहाण करून त्यांना 5 हजार रूपयांची मागणी केली असता फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे रोख पैसे नसल्याने जबरदस्तीने ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडुन त्यांच्या दुचाकी गाड्यांवरून पळुन गेले. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे Pune Kondhwa Police News पुणे भा.दं.वि. कलम 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Pune Crime News

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू करून नमुद गुन्ह्यातील आरोपीबाबत बातमीदारामार्फतीने माहिती काढत असताना दि.२१/०४/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री. बालाजी डिगोळे यांचे पथकातील पोअंम शाहिद शेख व लक्ष्मण होळकर यांना त्याच्या खास बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, दोन दिवसापुर्वी बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या मुलांना लुबाडणे आरोपी हे पुन्हा लुबाडण्याच्या उद्देशाने बोपदेव घाटात आलेले आहे. तेव्हा सदर आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके,शाहिद शेख,लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला व असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, कोंढवा पोस्टे पुणे शहर व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे बोपदेव घाट येथे जावुन स्टाफच्या दोन टिम तयार करुन आरोपी यांचा शोध घेत असताना बोपदेव घाटात अंधारामध्ये दोन दुचाकी गाड्धा टेबल पॉइंटवर आलेल्या दिसून आल्या. सदर गाड्यांवरील तीन इसमांनी त्यांच्या दुचाकी गाड्या टेबल पॉइंटवर पार्क केल्या. त्यातील मोपेड गाडीवरील चालकाने गाडीचे डिकीतून हत्यारे बाहेर काढली व ती तीघांनी आपापल्या पेंटमध्ये खोचून ठेवली. त्यानंतर ते टेबल पॉइंटवर आजु बाजुला टेहाळणी करीत फिरू लागले. सदर इसम हेच टेबल पॉइंवर जबरी चोरीचा प्रकार करीत असल्याचे आमचे लक्षात आले. पोलीस त्यांचे नजिक जात असताना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने ते पळत जाऊ लागले. पोलीस स्टाफने त्यांना घेरून पोलीस असल्याचे सांगितल्याने त्यांनी त्यांच्याकडील हत्यारे खाली जमिनीवर ठेवली, पोलीसांनी त्यांना हत्यारे घेवून सदर ठिकाणी येणाचे कारण विचारले असता त्यांनी सदर ठिकाणी बसलेल्या मुला मुलींना लुटण्याकरीता आल्याचे सांगितले. त्यांच्याकडील हत्यारांना व दुचाकी गाड्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे Pune Crime News

1) साहील अकबर बानेवाले, (20 वर्षे), संगम हॉस्पीटल जवळ, सिटी सेंटर रोड, उंड्री, पुणे
2) राहूल परवाराम गौतम, (21 वर्षे) हडपसर, पुणे.
3) गालीब बादशाह मेहबुब अत्तार, (19 वर्षे), हॉस्पीटल जवळ, सिटी सेंटर रोड, उंड्री, पुणे, असे असल्याचे सांगितले.

पोलिसांकडून हत्यार जप्त

आरोपींचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अद्याप पर्यंत एकुण 02 दुचाकी गाड्या, दोन धारदार कोयते एक धारदार सुरा व 03 मोबाईल फोन असा एकुण 1 लाख 72 हजार 250 रू किं चा मुद्देमाल हस्तगत करून पुढीलप्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहे. Pune Crime News

पोलीस पथक
अमितेश कुमार पोलीस आयुक्त (Pune CP Amitesh Kumar), प्रविण पवार सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप- आयुक्त. परिमंडळ-५, गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, पोहवा / ७९ निलेश देसाई, पोलीस नाईक गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला व यांच्या पथकाने केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे हे करीत आहेत. Pune Kondhwa Police News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0