Nitesh Rane : “खरा विलन ओळखा… शकुनी मामा मातोश्रीवरच बसलाय!” – नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर रोखठोक हल्ला

•“राज ठाकरेंच्या सभेवर सामनामध्ये शांतता का?”; सामना संपादकीयावरही राणेंचा थेट आरोप
मुंबई | राज ठाकरे यांच्या मीरारोड येथील सभेनंतर राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खदखद सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी आज ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
“लोकसभेचे काही उमेदवार विजयी झाले, आणि त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘सर तन से जुदा’चे नारे दिले गेले… हे नक्की कोण करतंय हे ओळखा,” असा रोखठोक सवाल करत राणेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर गंभीर आरोप लावले.
तसेच, “आज सामनामध्ये राज ठाकरे यांच्या सभेची बातमीच नाही. का नाही? सध्या ‘बंधु प्रेम’ सुरू आहे म्हणून? खरा शकुनी मामा मातोश्रीवरच बसलेला आहे,” असे म्हणत त्यांनी सामनाच्या भूमिकेवरही टीकास्त्र सोडलं. “हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दू सक्ती चालवणारे म्हणजे उद्धव ठाकरे,” अशी आगपाखडही त्यांनी केली.
नया नगरमधील स्थितीवरूनही नितेश राणे आक्रमक झाले. “तिथे मराठी बोलणं गुन्हा समजलं जातं. संविधान मान्य नसलेल्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. पण मराठी माणूस मात्र सतत सॉफ्ट टार्गेट!” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच, “कोरोनाकाळात संपूर्ण देश मास्क लावत होता, पण नया नगरमध्ये शरिया कायदा लागू होता,” असा गंभीर आरोप करत, “जे खुलेआम धमक्या देतात, त्यांना मराठी शिकवा. गरीब हिंदूंवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी हे पाहा,” असा सल्लाही त्यांनी दिला.



