Pune Spa Sex Racket | परदेशी मुलींची वेश्याव्यवसायासाठी ‘बोली’? ‘फंडिंग’ करणारा मास्टरमाईंड ‘रहीम’ कोण ?

- परदेशी मुलींना वेश्याव्यवसायासाठी दरमहा ठराविक ‘बोली’ ?
पुणे, दि. २५ जुलै, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Spa Sex racket, Pune crime News, Pune News
पुण्यातील उच्चभ्रू विमानतळ, बाणेर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट पुणे पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर खळबळजनक माहिती समोर येत आहे. परदेशी मुलींची वेश्याव्यवसायासाठी ‘बोली’ लावली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. थाईलँड येथील परदेशी मुलींना दरमहा ठराविक ‘बोली’ लावून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. Pune Spa Sex racket, Pune crime News, Pune News
विमानतळ येथील मेंशन स्पा येथील कारवाईत १६ मुलींचे रेस्क्यू करण्यात आले होते. यात १० परदेशी मुली होत्या. तर दुसऱ्या कारवाईत व्हिटोरीया थाई स्पा येथे कारवाईत ४ परदेशी मुलींना रेस्क्यू करण्यात आले होते. यामित्ताने पुण्यात परदेशी मुलींचा वेश्याव्यवसाय समोर आला होता. पुण्यात परदेशी मुलींना वेश्याव्यवसायासाठी मोठे आमिष देण्यात येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. Pune Spa Sex racket, Pune crime News, Pune News
मेंशन स्पा निमित्ताने सेक्स रॅकेटचा मास्टरमाईंड रहिम याचे नाव समोर आल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली होती. आता याच मास्टरमाइंड रहिमच हडपसर, खराडी व इतर ठिकाणी स्पा सेंटर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्पा साठी फंडिंग करणारा मास्टरमाईंड रहिमला कोणाचे अभय ?
काही ग्रॅम एमडी ड्रग्सवरून ४००० कोटींचे ड्रग्स रॅकेट मोडीत काढणारे पुणे पोलीस परदेशी मुलींचं सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्यानंतर स्पा साठी फंडिंग पुरवणारा मास्टरमाईंड रहिम पर्यंत पोहचणार का? हे पाहावे लागणार आहे.


