मुंबई

Amit Matkar : “कोठडीतून सुटून” नेत्याला दिली धमकी! पोलिसांच्या सुरक्षेचा फज्जा!

गांजाच्या प्रकरणातील आरोपी थेट मनसे नेत्याच्या कार्यालयात; ‘ही तुझी जागा नाही’ म्हणत पळाला

मुंबई – शहरात पोलिसांची सुरक्षा किती ठसठशीत आहे, हेच समजण्यास पुरेसा धक्का बसवणारा प्रकार नुकताच समोर आला आहे. आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेला गांजाच्या प्रकरणातील आरोपी, सातरस्ता परिसरात थेट मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांच्या कार्यालयात पोहोचतो, मुखवटा घालतो, धमकी देतो आणि पोलिसांच्या नजरेआड होऊन पसार होतो – हे सगळं सीसी टीव्हीमध्ये कैद होतं, पण पोलिस मात्र फक्त ‘अदखलपात्र’ गुन्हा दाखल करतात!

16 मे रोजी जे. आर. बोरिचा मार्गावरील मटकर यांच्या कार्यालयात हा आरोपी पोहोचला. “इथे का बसलाय? ही तुझी जागा नाही, निघून जा नाहीतर परिणाम भोगशील,” अशा शब्दांत दिलेली धमकी ऐकून मटकर चक्रावले. आरोपी मित्राच्या दुचाकीवर मागे बसून आला होता आणि चेहऱ्यावर मुखवटा होता – एक प्रकारे हा ‘फिल्मी स्टाईल’ प्रकार होता, पण तो भयावह वास्तव ठरला.

विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वी 40 किलो गांजासह अटक झाली होती आणि 2017 मध्ये मटकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

21 मे रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर देखील फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेल्याने, पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यायप्रणालीच्या सुरक्षा व्यवस्थेतील या गंभीर उणिवा आता चव्हाट्यावर येत असून, “कोठडीत असलेला आरोपी बाहेर कसा आला?” हा प्रश्न ठळकपणे उभा राहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0