मुंबई

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाला हादरा! सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये शक्तिप्रदर्शनासह प्रवेश

•Sudhakar Badgujar In BJP “अनादर केला त्यांना दाखवू खरी ताकद,” बडगुजरांचा ठाकरे गटाला थेट इशारा

मुंबई | नाशिकच्या राजकारणातील मातब्बर नेते सुधाकर बडगुजर यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) सोडून थेट भाजपमध्ये दमदार शक्तिप्रदर्शनासह प्रवेश केला. मुंबईतील नरीमन पॉइंटवरील भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते रवींद्र चव्हाण यांच्या अनुपस्थितीत काही वेळ बडगुजर यांना ताटकळत थांबावे लागले. मात्र नंतर पक्षनेत्यांच्या स्वागतासह त्यांनी प्रवेश केला.

“मी समाजासाठी काम करत राहिलो. कोविड काळातही कुणी पुढे येत नव्हतं, तेव्हा मी कोविड सेंटर चालवलं. पण ज्यांनी माझा अनादर केला, त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल,” अशा शब्दांत बडगुजर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली आणि दृष्टिकोन यांचे त्यांनी कौतुक केले आणि भाजपकडून मिळालेली जबाबदारी पूर्ण ताकदीनं पार पाडण्याचं आश्वासन दिलं.

यावेळी बडगुजर यांच्यासोबत माजी मंत्री बबन घोलप यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत, “ज्याचं अपमान झाला त्याच्यासोबत राहणं हेच खरं राजकारण,” अशा शब्दांत ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजरांचा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0