Rohit Arya Encounter : पवई स्टुडिओतील ‘ओलीस’ प्रकरणाला हिंसक वळण; आरोपी रोहित आर्याचा एन्काऊंटर

Mumbai Police On Rohit Arya : 17 मुलांची सुटका करताना पोलिसांनी केला गोळीबार; रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली
मुंबई (पवई) :- मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये Powai RA Studio साधारण 17 मुलांना डांबून ठेवल्याच्या खळबळजनक प्रकरणाला हिंसक वळण लागले आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी रोहित आर्या Rohit Arya याचा मृत्यू झाला आहे. रोहित आर्याच्या छातीत गोळी लागली होती. मुलांची सुटका केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. Mumbai Latest Crime News
गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओमध्ये एका वेब सीरिजसाठी ऑडिशनची प्रक्रिया सुरू होती. या ऑडिशनसाठी लहान मुलांना बोलावण्यात आले होते. मुले सकाळी 10 वाजता ऑडिशनसाठी स्टुडिओत जायची आणि रात्री 8 वाजता बाहेर पडायची. दरम्यान, दुपारी त्यांना जेवणासाठी सुट्टी दिली जात असे. Mumbai Latest Crime Ecounter News
आज (गुरुवार) मात्र ही मुले जेवणासाठी बाहेर आली नाहीत. त्यानंतर रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने अंदाजे 17 मुलांना डांबून ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आणि परिसरात खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने स्टुडिओकडे धाव घेतली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान, मुलांची सुटका करण्याच्या प्रयत्नात आरोपी रोहित आर्यावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.



