क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Breaking News : मुंबईत दिवसाढवळ्या स्टुडिओमध्ये 20 मुले ‘ओलीस’; युट्यूबर ‘रोहित आर्या’ ताब्यात, मनोरुग्ण असल्याचा संशय

YouTuber Rohit’s Arya Latest News : आर ए स्टुडिओमध्ये तीन तास मुलांना डांबून ठेवले; जेवणासाठी बाहेर न सोडल्याने प्रकार उघडकीस

मुंबई :- मुंबईतील एका गजबजलेल्या परिसरात ‘आर ए स्टुडिओ’च्या Mumbai RA Studio पहिल्या मजल्यावर अभिनय वर्गासाठी आलेल्या सुमारे 20 लहान मुलांना दिवसाढवळ्या ओलीस (डांबून) ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले. Mumbai Latest Crime News

गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टुडिओमध्ये ऑडिशन सुरू होते. आज सकाळी ऑडिशनसाठी सुमारे 100 मुले आली होती. आरोपी रोहित आर्या याने 80 मुलांना घरी पाठवले, परंतु उर्वरित अंदाजे 15 ते 20 मुलांना स्टुडिओमधील एका खोलीत बंद करून डांबून ठेवले.

हा प्रकार दुपारी 1 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल तीन तास सुरू होता. मुले खिडकीतून बाहेर डोकावत असल्याचे आणि त्यांना जेवणासाठी बाहेर न सोडल्याचे पाहून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलांना डांबून ठेवल्याची माहिती मिळताच स्टुडिओबाहेर एकच गोंधळ उडाला आणि पालकांनी धाव घेतली.

15 ते 20 मुलांना स्टुडिओमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही बाजूंनी स्टुडिओला वेढा टाकला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत या सर्व मुलांची सुटका केली आहे, ज्यामुळे पालकांच्या जीवात जीव आला आहे.

पोलिसांनी आरोपी रोहित आर्या याला ताब्यात घेतले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. आरोपीच्या नेमक्या मागण्या काय होत्या आणि त्याने मुलांना ओलीस का ठेवले, हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, आरोपी रोहित आर्या हा मनोरुग्ण (Mental Illness) असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या घटनेमागील नेमके कारण शोधत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0