मुंबई

Mumbai Railway Update : गणेश विसर्जनासाठी मध्य रेल्वेची खास सोय; हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष लोकल धावणार

सीएसएमटी ते पनवेलदरम्यान धावणार चार विशेष लोकल, प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई :- अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईत उसळणाऱ्या गर्दीला लक्षात घेऊन मध्य रेल्वेने गणेश भक्तांसाठी विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा प्रामुख्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे. 6 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्री (शनिवार/रविवार) या विशेष लोकल धावणार आहेत.

हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक

सीएसएमटी ते पनवेल

पहिली लोकल मध्यरात्री 1.30 वाजता सीएसएमटीहून सुटून पहाटे 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल.
दुसरी लोकल पहाटे 2.45 वाजता सीएसएमटीहून सुटून पहाटे 4.05 वाजता पनवेलला पोहोचेल.

पनवेल ते सीएसएमटी

पहिली लोकल रात्री 1.00 वाजता पनवेलहून सुटून पहाटे 2.20 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
दुसरी लोकल मध्यरात्री 1.45 वाजता पनवेलहून सुटून पहाटे 3.05 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

मध्य रेल्वेने याआधीच गणेशोत्सवाच्या काळात 4,5 आणि 6 सप्टेंबरच्या रात्री मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण/ठाणे) विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. आता त्यात हार्बर मार्गाचीही भर पडली आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर ठरणार आहे. मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0