मुंबई

Jitendra Awhad : “तुळजाभवानी गाभारा पाडू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर हल्लाबोल”

•ऐतिहासिक दगड हलवणे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासावर घाला, गाभाऱ्याच्या संरक्षणाची ठाम भूमिका

तुळजापूर :- तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामावरून राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र टीका केली आहे. “मंदिरातील गाभारा पाडण्याच्या बेतात सरकार आहे, पण तो कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

मंगळवारी तुळजापूरला भेट देऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतलं व मंदिरातील सुरू असलेल्या दुरुस्ती आणि विकास कामांची पाहणी केली. “माझा विकासाला विरोध नाही, पण ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या गाभाऱ्याला हात लावणे म्हणजे आपल्या संस्कृतीवर घाला,” असे आव्हाड म्हणाले. शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्या काळाशी जोडलेल्या या दगडांचे जतन आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध दर्शवत मंदिर परिसरात घोषणाबाजी केली व आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. तरीही, “गाभाऱ्याला हात लावायचा नाही, बाहेरून सुशोभीकरण करा, पण मंदिराच्या आत्म्याला धक्का लागू देणार नाही,” ही आपली ठाम भूमिका असल्याचे आव्हाडांनी पुन्हा अधोरेखित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0