हिंगोली

Nitesh Rane : भाऊच्या धक्क्यावर घुसखोर रोहिंग्या-मच्छीमारांवर मच्छी विकास मंत्र्यांचा कडक इशारा!

नितेश राणे म्हणाले – “कोणताही घुसखोर हिंदू राष्ट्रात राहू शकणार नाही!”

मुंबई‌ :- भाऊच्या धक्क्याच्या परिसरात घुसखोर बांगलादेशी व रोहिंग्या मच्छीमारांनी कोळी समाजाच्या बांधवांवर अमानुषतेने अरेरावी केली, तर एका कोळी बहिणीवरही हात उगारण्याची धडक घटना घडली आहे. यामुळे कोळी समाजात ताणतणाव निर्माण झाला असून, या घटनेवर राज्याचे मच्छी विकास मंत्री नितेश राणे यांनी कडक भूमिका घेतली आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, “आमच्या कोळी बांधवांच्या मच्छी विक्रीच्या अधिकारावर अवैध घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी अन्याय केला. एका कोळी भगिनीवर हात उगाळण्याची हिंमत करत आहेत. आम्ही त्यांना कधीही सहन करणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “कोळी समाजाने हिंदुत्ववादी संघटनांना पत्र पाठवून मदत मागितली होती. आम्ही त्यांच्याशी एकजूट दाखवत या घटनेचा कठोर निषेध करत आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने घुसखोरांविरोधात कडक कायदे लागू करावेत. हिंदू राष्ट्रात घुसखोरांना कोठेही राहण्याचा अधिकार नाही.”

नितेश राणे यांनी इशारा दिला, “हे कोळी समाजाचे बंदर आहे, कराचीचं नाही! आमच्या भाऊच्या धक्क्यावर कोणी त्रास दिला तर आम्हाला तेथे कसं पाठवायचं ते आम्हाला ठाऊक आहे.”

या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला असून प्रशासनाने सुरक्षा वाढवली आहे. पुढील काळात या भागात कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून दिले गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0