Pune Crime News : गावठी पिस्तुल, गावठी कट्टा विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! 3 जिवंत काडतुस देखील जप्त!

•1 पिस्तुल,1 गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे :- भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याला सूचित केले होते की, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था, अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाई करणे, पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला चेक करणे, पाहिजे फरारी आरोपींना चेक करणे, तडीपार आरोपींना चेक करणे तसेच संशयित आरोपी चेक करणे अशा सूचना दिल्या होत्या. या दरम्यान कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून पेट्रोलिंग करीत असताना एका तरुणाला गावठी कट्टा, गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे घेऊन विक्री करण्यासाठी आलेल्या अटक करण्यात आली आहे.शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद, (वय 19, रा. आदर्श चाळ, राजिव गांधी नगर, रामराज्य शाळे शेजारी, सुखसागरनगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे ) नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाचे पोलीस हवलदार सतीश चव्हाण आणि पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतीबन सोसायटीचे बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत, कोंढवा बु. परिसरात एकजण देशी बनावटीची गावठी पिस्तुल, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे. या मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक निरीक्षक राकेश जाधव, यांच्या पथकाने सापळा लावून शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद अटक केली.
दरम्यान आरोपी शेख हा गावठी पिस्तुल कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याची माहीती अदयाप गुलदस्त्यात आहे. कट्टा बाळगणे या आरोपाखाली स्थानिक कोंढवा पोलिस ठाण्यात शेख विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे. तसेच आरोपीकडून 71 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.



