मुंबई

Mumbai Water Supply Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 10 टक्के पाणीकपातीचे संकट; शहर आणि पूर्व उपनगरांना बसणार फटका

•पिसे येथील पाणीपुरवठा केंद्राच्या परिरक्षणाचे काम; 27 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत 11 विभागांत कपात

मुंबई | मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाच्या (Maintenance) कामासाठी पालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आज, मंगळवार 27 जानेवारीपासून शनिवार 7 फेब्रुवारीपर्यंत मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील एकूण 11 विभागांमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

या 11 विभागांमध्ये होणार कपात महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’, ‘एफ-दक्षिण’ आणि ‘एफ-उत्तर’ या विभागांसह पूर्व उपनगरातील ‘टी’, ‘एस’, ‘एन’, ‘एल’, ‘एम-पूर्व’ आणि ‘एम-पश्चिम’ या विभागांमध्ये 10 टक्के पाणीकपात असेल. यामध्ये प्रामुख्याने नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र, भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या परिसरांचा समावेश आहे.

ठाणे आणि भिवंडीलाही फटका मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील काही विभागांमध्येही ही 10 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईसह लगतच्या शहरांतील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन पिसे येथील यंत्रणेचे वार्षिक देखभाल-दुरुस्तीचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने ही कपात करण्यात आली आहे. या कालावधीत पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0