Mumbai Train Robbery News : मोबाईल चोरट्याचा ‘ठाणे-मुंबई’ एक्स्प्रेसला ब्रेक! – गर्दीच्या ठिकाणी हात साफ करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 1.21 लाखांचे 9 महागडे फोन जप्त!

Thane Crime Branch Unit 1 News : गुन्हे शाखा घटक-1 ची धडाकेबाज कारवाई; ॲपल, सॅमसंग कंपन्यांचे फोन चोरून 7 गुन्ह्यांची उकल, मुंब्रा येथून आरोपी ताब्यात
ठाणे :- ठाणे आणि मुंबई शहरातील लोकल ट्रेन तसेच गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना लक्ष्य करून मोबाईल फोन चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला ठाणे गुन्हे शाखा घटक-1 Thane Crime Branch च्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीमुळे विविध कंपन्यांचे 9 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, मुंबई आणि ठाणे परिसरातील 07 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Thane Latest Crime News
सीसीटीव्ही आणि बातमीदारातून मिळाली माहिती
दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे मार्केट परिसरातील स्टेशन रोडवर एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे जुना मुंबई-आग्रा रोड, कळवा येथे सापळा रचण्यात आला.या सापळ्यात रफिक मोहंमद शेख (वय 44, रा. मुंब्रा) या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपासणी केली असता ॲपल कंपनीचे 3 आयफोन मिळून आले, ज्यापैकी एक फोन चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
विविध ठिकाणचे गुन्हे उघड
आरोपी रफिक शेख याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने राबोडी, कापूरबावडी (ठाणे), कुर्ला रेल्वे, बांद्रा रेल्वे, बांद्रा पोलीस ठाणे आणि ठाणे रेल्वे (मुंबई) अशा अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ॲपल आयफोनसह सॅमसंग, विवो आणि रेडमी कंपन्यांचे, सुमारे 1 लाख 20 हजार 990 किंमतीचे एकूण 07 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. अन्य दोन मोबाईलबाबत तपास सुरू आहे.
सध्या आरोपी रफिक शेख ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, गुन्हे शाखा घटक-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई पार पाडली.


