मुंबई

Pooja – Soham Bandekar Reception : पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांच्या शाही रिसेप्शनला राजकीय-मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी!

•आदित्य ठाकरेंकडून नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा; आदेश बांदेकरांची कडकडून भेट, “मी आहे, मी आहे…” म्हणत आदित्य ठाकरेंची फोटोग्राफर्ससोबत मजेशीर गप्पा

मुंबई :- मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांचा शाही रिसेप्शन सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंची खास उपस्थिती

या शाही सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही उपस्थिती लावून सोहम आणि पूजाला शुभेच्छा दिल्या.

आदेश बांदेकरांची मिठी

आदित्य ठाकरे स्टेजवर नवविवाहित जोडप्याला भेटायला जात असताना त्यांची भेट सोहमचे वडील आदेश बांदेकर यांच्याशी झाली. आदित्य ठाकरेंना पाहताच आदेश बांदेकर खूपच खूश झाले आणि त्यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. आदित्य ठाकरेंनीही तितक्याच आपुलकीने ही मिठी स्वीकारली.यानंतर आदित्य ठाकरेंनी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं अभिनंदन केलं.त्यानंतर त्यांनी सोहमला भेटून मिठी मारली आणि पूजासह दोघांनाही शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत फोटो काढले.

फोटोग्राफर्ससोबत मजेदार क्षण

आदित्य ठाकरे स्टेजवर पोहोचताच खाली उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्यांच्यावर खिळले. काही वेळाने फोटोग्राफर्सनी ‘आदित्य वेट वेट वेट…’ अशी हाक मारायला सुरुवात केली. यावर आदित्य ठाकरे खळखळून हसले आणि म्हणाले, “मी आहे, मी आहे… बाकीच्यांनाही फोटो काढायचेत…” त्यानंतर त्यांनी पोज दिली आणि आनंदात तिथून निघाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0