ठाणेमुंबई
Trending

कुर्ल्यात मध्यरात्री भीषण आग: 20 गाळे जळून खाक, लाखोंचे नुकसान

Kurla Latest Fire Accident News : सीएसटी रोडवरील कपाडिया नगर परिसरात ऑटोमोबाईल्सच्या साठ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले ; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली; 3000 चौ. फूट क्षेत्रात मोठे वित्तीय नुकसान

मुंबई :- कुर्ला पश्चिम येथील कपाडिया नगर, गुरुद्वारा परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.ऑटोमोबाईल्सचे सुटे भाग, टायर आणि स्क्रॅप मटेरियलचा साठा असलेल्या गाळ्यांना ही आग लागल्याने ती वेगाने पसरली आणि सुमारे 15 ते 20 गाळे जळून खाक झाले. Kurla Latest Fire Accident News

मध्यरात्री लागली आग

मध्यरात्री अंदाजे 2.30 वाजता ही आग भडकली. गाळ्यांमध्ये टायर, इलेक्ट्रिक वायरिंग आणि ज्वलनशील वस्तूंचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये अंदाजे 3000 चौरस फूट क्षेत्रातील गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, यात मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0