Osmanabad Name Changes : ऐतिहासिक नावात बदल, नवीन ओळख देणार ;’उस्मानाबाद’ होणार ‘धाराशिव’

•राज्य सरकार आणि भारतीय रेल्वे प्रशासनाने केली महत्त्वाची घोषणा धाराशिव होणार उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नवे रूप!
मुंबई :- महाराष्ट्रातील उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नाव आता ‘धाराशिव’ असे बदलण्यात आले आहे. राज्य सरकारने शहराचे नाव धाराशिव ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रेल्वेने त्वरित स्टेशनचे नाव आणि कोड (DRSV) बदलून नवे रूप दिले आहे. हा निर्णय स्थानिक संस्कृती आणि इतिहासाला समर्पित असल्याने विशेष महत्त्वाचा ठरला आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, स्टेशनवरील सर्व साइनबोर्ड, उद्घोषणा, तिकिट प्रणाली आणि अधिकृत नोंदीमध्ये ‘धाराशिव’ नाव वापरणे अनिवार्य केले जाईल. नामांतरणाच्या तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी मुंबई पीआरएस प्रणाली 31 मे रात्री 11:45 ते 1 जून सकाळी 1:30 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
धाराशिव – सांस्कृतिक वारसाचा नव्या युगात प्रसार
उस्मानाबाद हे नाव 20 व्या शतकातील हैदराबाद रियासतच्या शासकाच्या नावावरून होते; पण ‘धाराशिव’ हे नाव त्या भागातील 8व्या शतकातील गुफा परिसराचे नाव आहे. या नावबदलामुळे स्थानिकांचा सांस्कृतिक अभिमान वाढेल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.



