मुंबई

Mumbai Crime News : 14 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर उत्तर प्रदेशातून जेरबंद!

•मुंबईतील मारहाण व चोरीच्या गुन्ह्यातील ‘फरार’ आरोपी शशीकुमार यादव याला आर. ए. के. मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-4 ने आपल्या तपास कौशल्याच्या जोरावर एका जुन्या आणि गंभीर गुन्ह्यातील 14 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करून मोठे यश मिळवले आहे. मुंबईतील र. अ. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी सातत्याने न्यायालयाच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) काढण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

2011 मध्ये र. अ. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले नुसार आरोपी शशीकुमार मातबर यादव (तेव्हाचे वय 32 ) याच्यावर मारहाण, दुखापत आणि चोरीच्या कलमांखाली (कलम 324, 323, 427, 452, 34 भादंवि) गुन्हा दाखल होता. शिवडी येथील ठोकरशी झोपडपट्टी, चायना मिल समोरच्या पत्त्यावर तो राहात होता.

आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांनी या आरोपीचा शिवडी परिसरात शोध घेतला. मात्र झोपडपट्टीतील अनेक चाळी आणि घरांमध्ये तो सापडला नाही. यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि माहिती तंत्राचा वापर करत आरोपी त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळवली.

पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आणि पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलीस पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली असून त्याला पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे.

या यशस्वी कामगिरीबद्दल आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखालील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पालवी जाधव आणि अंमलदार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपी सातत्याने हजर राहत नसल्याने मा. प्रथम न्यायदंडाधिकारी 13 वे न्यायालय, दादर यांनी त्याच्याविरोधात वॉरंट काढले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0