पुणे

Pune News : पडळकरांच्या विरोधात पुण्यात फलकबाजी; ‘सडकछाप नेता’, ‘संस्कार करायला बाप कमी पडला’ असे फलक चर्चेत

•कोथरुडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत भाजपच्या संस्कृतीवर बोट

पुणे :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता पुण्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी कोथरुड परिसरात पडळकर यांच्या निषेधार्थ फलक लावले आहेत. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पडळकरांना पातळी सोडून बोलू नये, असा सल्ला दिला आहे.

कोथरुडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी लावलेल्या फलकांवरील मजकूर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकांवर म्हटले आहे की, “तो बाप शिक्षक असूनही संस्कार करायला कमी पडला. मुख्यमंत्री महोदय हीच आहे का भाजप आणि आरएसएसची शिकवण आणि संस्कृती?” तसेच “गोपीचंद पडळकरसारखा सडकछाप नेता महाराष्ट्रात ना पूर्वी कधी झाला असेल ना पुढे कधी होईल,” असेही या फलकांवरून म्हटले आहे.

अजितदादाही संतापले
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये. प्रत्येकाने बोलताना तारतम्य राखले पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले.

ते म्हणाले, “अरेला कारे करणे सगळ्यांनाच येते. सगळ्यांना सगळ्या प्रकारची भाषा येते. पण ती आपली संस्कृती नाही, परंपरा नाही. ती आपल्या वडिलधाऱ्यांची शिकवण नाही. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतो, त्यांनी सांगितलेले विचार आपण वाचतो. त्यामुळे सगळ्यांनी निश्चितपणे काही बंधनं पाळली पाहिजेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0