मुंबई

Mumbai Crime News : जे. जे. हॉस्पिटलमधून पळालेली बांगलादेशी महिला आरोपी अखेर जेरबंद

  • पोलिसांनी 3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर नवी मुंबईतून ठोकल्या बेड्या

मुंबई :- मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या एका बांगलादेशी महिला आरोपीला अखेर सर जे. जे. मार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.गेली तीन दिवस पोलिसांना चकमा देणाऱ्या या आरोपी महिलेला नवी मुंबईतील घनसोली परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आले.

वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली 21 वर्षीय रुबीना इरशाद शेख ही बांगलादेशी महिला आरोपी भायखळा कारागृहात न्यायबंदी म्हणून होती. तिला दि. 14 ऑगस्ट रोजी उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात आणले असता, सकाळी 11 वाजता तिने महिला पोलीस अंमलदारांच्या हाताला झटका देऊन पळ काढला होता. या घटनेनंतर सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तिचा शोध सुरू होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना, सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि त्यांच्या पथकाने वेषांतर करून सलग तीन दिवस आरोपीच्या संशयित ठिकाणांवर पाळत ठेवली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला. अखेर, 18 ऑगस्ट रोजी नवघर अली रोड, तलवली, घनसोली, नवी मुंबई येथे सापळा रचून तिला अटक करण्यात आली.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त तनवीर शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक मुकुंदा वाघमोडे आणि उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांच्यासह पोलीस हवालदार नियाजुद्दीन तडवी, सचिन पाटील, पोलीस शिपाई मंदार घाडगे, प्रवीण शेवरे, दीपक डावरे, ब्रह्मदेव कोलपुसे, महिला पोलीस शिपाई लहाने आणि गोफने यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0