महाराष्ट्र
Trending

Mohan Raut Murder : 11 गोळ्यांनी शहीद झालेल्या शिवसैनिकाला अखेर न्याय!

Mohan Raut Murder Badlapur News : मोहन राऊत हत्या प्रकरणी चार आरोपींना जन्मठेप, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

बदलापूर | ‘शिवसेनेचा बाणा जगाला दाखवणाऱ्या’ मोहन राऊत यांच्या थरारक हत्येला तब्बल 11 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर अखेर दोषींना शिक्षा ठोठावण्यात आली. ठाणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने या खळबळजनक हत्याकांडातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. Mohan Raut Murder Badlapur News तसंच अन्य कलमान्वये एक वर्ष तुरुंगवास आणि 1 हजाराचा अतिरिक्त दंडही लावण्यात आला आहे.या निकालानंतर शिवसैनिकांच्या भावना उचंबळून आल्या असून, “हे केवळ शिक्षा नाही, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आमच्या नेत्यानं दिलेल्या साक्षेला मिळालेला न्याय आहे,” अशी भावना शिवसेना उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी व्यक्त केली.
नेमके काय प्रकरण आहे?

23 मे 2014 रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोहन राऊत हे आपल्या बदलापूरमधील जनसंपर्क कार्यालयात बसले होते. याच दरम्यान, चार सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक कार्यालयात घुसून त्यांच्यावर अकरा गोळ्यांचा मारा केला. गोळीबारात राऊत जागीच कोसळले.

गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पानटपरीवर असलेले स्थानिक नागरिक आणि शेजारी धावतच कार्यालयात आले, परंतु तोपर्यंत हल्लेखोर मागील दरवाजाने पिस्तुल घेऊन पसार झाले होते.

गंभीर जखमी अवस्थेत असतानाच मोहन राऊत यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे मृत्यूपूर्व साक्षीच्या माध्यमातून पोलिसांना सांगितली. त्यानुसार, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपशहरप्रमुख योगेश राऊत, पिंट्या म्हसकर, गंगाराम लिंगे, आणि अजय गौरव अशी चौघांची नावे पुढे आली.

तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, योगेश राऊत यांच्यावर याआधी गोळीबार झाला होता. त्या प्रकरणातील आरोपींसाठी मोहन राऊत हे जामीनासाठी प्रयत्न करत होते, असा संशय योगेश राऊत यांना वाटत होता. त्यामुळेच कट रचून मोहन राऊत यांचा ‘काटा’ काढण्यात आला, असे तपासात उघड झाले.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. संगीता फड यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. सरकार पक्षातर्फे 38 साक्षीदारांची साक्ष, राऊत यांच्या मृत्यूपूर्व जबानी साक्ष, पानटपरीवरील प्रत्यक्षदर्शी, आणि कार्यालयात सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या यांसारख्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0