क्राईम न्यूजठाणेपुणेमुंबई
Trending

Mumbai Car Robbery : महागड्या गाड्या चोरणाऱ्या ‘बंबय्या’ला बेड्या

Mumbai Police Arrested Car Robbers : सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडले; 70 हून अधिक गुन्हे उघड

मुंबई :- मुंबई, पुणे आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये महागड्या गाड्या व त्यातील मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जुनेद युनुस शेख उर्फ ‘बंबय्या’ असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे 70 हून अधिक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. Mumbai Latest Crime News

मागील काही दिवसांपूर्वी वडाळा परिसरातून संजय ठोंबरे यांची होंडा सिटी कार चोरीला गेली होती. याप्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-4, रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. मुंबईतील विविध भागांतील 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. सहायक पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग,योगेश गावडे यांच्या देखरेखीखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सांताक्रूझ परिसरात सापळा रचून जुनेद शेखला ताब्यात घेतले.

पोलिसांनी जुनेदची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे पिंपरी-चिंचवड येथे चोरीला गेलेले तीन मोबाईल सापडले. चौकशीत जुनेदने मुंबईतून चोरी केलेली कार पिंपरी-चिंचवड येथे इतर गुन्हे करण्यासाठी वापरल्याचे कबूल केले. पोलिसांनी चोरीला गेलेली कार जप्त करून 100% मालमत्ता हस्तगत केली आहे.

जुनेद युनुस शेख उर्फ ‘बंबय्या’ याच्यावर गुजरात, पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, नवी मुंबई यांसारख्या शहरांमध्ये 70 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते आणि तपास पथकातील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0