
Ajit Pawar Died During Aeroplane Landing : लँडिंग दरम्यान विमानाला भीषण आग; ‘दादा’ पर्वाचा अकाली अस्त, महाराष्ट्र शोकसागरात
बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वय) यांचे आज (28 जानेवारी 2026) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना सकाळी 8.45 च्या सुमारास त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार Ajit Pawar यांच्यासह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
अजित पवार हे आज बारामतीमध्ये चार प्रचार सभांसाठी मुंबईहून खासगी विमानाने (Learjet 45) निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या तयारीत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच काही अंतरावर असलेल्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की विमानाचा अक्षरशः कोळसा झाला.
मदतीसाठी धाव, पण काळाचा घाला
विमान कोसळल्यानंतर स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले. अजित पवार यांना अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढून बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, विमानात असलेले दोन वैमानिक, एक अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक यांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.Maharashtra Breaking News
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा शेवट झाला आहे. साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहिलेले अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ते प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण बारामतीसह राज्यात शोककळा पसरली असून सर्व राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


