Maharashtra Politics : ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा मोठा धक्का ! उद्धव ठाकरे यांचे दोन नगरसेवक शिंदे गटात

•ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिंदे गटाने धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे दोन खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे दोन्ही माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने पश्चिम उपनगरातील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. तर, गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटात होणारी गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये.



शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर , संजय पवार यांनी रविवारी (9 मार्च) रोजी मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही नगरसेवकांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही माजी नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तुफान हल्ला चढवला.
इंडिया जिंकली त्यांचं आपण अभिनंदन करुया. आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला, त्यांच स्वागत करतो. मनापासुन शुभेच्छा देतो. अडिच वर्ष महायुती सरकार काम करत होतं. लाडक्या बहिणीमुळे पुन्हा महायुती सरकार सत्तेत आलं. मुंबईत विकास होतोय, अनेक चांगले निर्णय आपण घेतले आहेत. आपले आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे एवढे आमदार निवडून आले नव्हते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.