क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Operation Black Forest : नक्षलविरोधी लढ्यात ऐतिहासिक विजय: ‘सीपीआय-माओवादी’चा महासचिव बसा वराजू ठार

Chhattisgarh Operation Black Forest : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये ऑपरेशन दरम्यान 27 कडवट नक्षलवादी ठार,ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनंतर एकूण 54 अटक, 84 नक्षलवादी आत्मसमर्पित

ANI :- भारताच्या नक्षलविरोधी लढ्यात काल (21 मे) एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज झालेल्या एक मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांनी 27 कडवट माओवादी नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या कारवाईत ‘सीपीआय-माओवादी’ या संघटनेचे महासचिव नामबाला केशव राव उर्फ बसा वराजू याचा समावेश आहे. बसा वराजू हा नक्षल चळवळीचा प्रमुख आणि कणा मानला जात होता.

गेल्या तीन दशकांत प्रथमच इतक्या उच्च दर्जाचा नक्षल नेता सुरक्षा दलांकडून ठार करण्यात आला आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल देशभरातून सुरक्षा दलांचे अभिनंदन केले जात आहे.

या यशानंतर ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’चे यशही पुढे आले आहे. या मोहिमेअंती छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून, 84 जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0