मुंबईठाणे
Trending

Maharashtra Election : मतदार यादीतील त्रुटी सुधारण्यासाठी पालिका कर्मचारी 1 डिसेंबरपासून घराघरात! – मुंबईतील दुबार नावे, लेखनिकांच्या चुका तपासणीसाठी विशेष मोहीम

Maharashtra Election Latest News : एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंद झाल्यास ‘दोन तारे’ खूण; मतदारांकडून अर्ज घेऊन मतदान केंद्र निश्चित करणार

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आज, 1 डिसेंबरपासून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रारूप मतदार यादीतील विविध त्रुटींचे निराकरण करणार आहेत. लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागात अंतर्भूत झालेले मतदार आणि दुबार नावे पडताळणी आदी समस्या सोडवण्यासाठी मुंबईतील वसाहती, गृहनिर्माण संकुले आणि इमारतींमधील मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला जाईल.

मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिक वेळा असलेल्या नावांसमोर ‘ (**) अशी खूण करून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुबार नावांची सत्यता पडताळण्यासाठी पालिका कर्मचारी मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र यांची प्राथमिक तपासणी करतील. त्यात साम्य आढळल्यास, संबंधित मतदाराशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेतली जाईल.

संबंधित मतदार प्रत्यक्षात एकच व्यक्ती असल्याची खात्री पटल्यावर, ते नेमके कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहेत, याबद्दल त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज घेतला जाईल. त्यानुसार मतदाराच्या इच्छेप्रमाणे मतदान करण्यासाठी प्रभागातील मतदान केंद्र निश्चित करून देण्यात येणार आहे. तसेच, ज्या मतदारांची नावे विधानसभा मतदार यादीत असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांची नावे समाविष्ट करण्याचे कामही या भेटीदरम्यान केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0