क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

कोल्हापुरात मध्यरात्री खळबळ! – हॉकी स्टेडियम रोडवर तरुणाचा मृतदेह विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळला

Kolhapur Hockey Stadium Murder News : आत्महत्या की हत्या? वायरीने बांधलेला मृतदेह सापडल्याने गूढ वाढले; पोलीस तपासाला सुरुवात

कोल्हापूर :- कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच असताना, आज (1 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. हॉकी स्टेडियम रोडवर सुमारे 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोडवर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला या तरुणाचा मृतदेह विद्युत वायरीने बांधलेला आढळला. मृतदेहाची स्थिती पाहता, ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

ओळख पटवण्याचे काम सुरू: संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस तपासानंतरच या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, तसेच उपनगरांमध्ये वाढलेली दहशत हा देखील चिंतेचा विषय बनला आहे.

दोन दिवसांपूर्वीची घटना

यापूर्वी दोन दिवसांपूर्वी, सुमित विक्रांत तेली (वय 30) या तरुणाने ‘मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे. ‘दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह गुरुवारी (तारीख नमूद नाही) सापडला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0