पुणे

Pune Crime News : पुण्यात किरकोळ वादातून हवेत गोळीबार करणारे सहा आरोपी जेरबंद

•नांदेड सिटी पोलिसांची मोठी कारवाई; सिंहगड रस्त्यावर घडली होती घटना.

पुणे :- दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या सहा आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (4 ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली होती.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी सायंकाळी सहा आरोपी दुचाकीवरून जात असताना, त्यांच्या दुचाकीचा एका तरुणाच्या गाडीला धक्का लागला. यावरून झालेल्या वादात आरोपींनी त्या तरुणाला जिवे मारण्याची धमकी दिली आणि पिस्तूल काढून हवेत तीन गोळ्या झाडल्या. यानंतर ते सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा शोध घेतला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हे सर्व आरोपी खडकवासला चौपाटीजवळ थांबले होते. पोलिसांनी सापळा रचून सहाही आरोपींना अटक केली. यात साहिल चव्हाण, मंदार चव्हाण, प्रशांत चव्हाण, अभिजित चव्हाण, आकाश चव्हाण आणि गितेश जाधव यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात किरकोळ कारणांवरून हाणामारी, तोडफोड आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0