Sushma Andhare : आम्ही विश्वासघाताचे विषारी गोट पचवले ; शिवसेना नेत्या सुषमा अंधारे
•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या Sushma Andhare यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलेला चॉकलेट वर ट्विट केले आहे
मुंबई :- राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्याचे विरोधी पक्ष असलेले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे सरकारच्या विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भ्रष्ट सरकार… कमिशन सरकार… खोके सरकार असा नारा दिला. आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आमदार अधिवेशनाला उपस्थित आहे. शिंदे गटाचे हे शेवटचे अधिवेशन आहे असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. शेतकरी, मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, पुणे अपघात प्रकरण, ड्रग्ज प्रकरण यांसारखे ठळक मुद्दे अधिवेशनात मांडून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडी करण्याचा प्रयत्न अधिवेशनात होणार आहे. सर्व चालू असतानाच उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेफ्ट मधील प्रवास. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शिवसेना नेत्यांना दिलेले चॉकलेट अनिल परावे यांना भरवलेला पेढा या सर्व गोष्टीमुळे राजकीय वाट चर्चांना उधाण आले आहे. परंतु आता शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्योग मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही एक ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणतात की विश्वासघाताचे विषारी घोट आम्ही पचवले आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांनी दिलेले चॉकलेट आम्हाला सहज पचेल परंतु आम्हाला दिलेले चॉकलेट हे जनतेला देऊ नये असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे.
सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले?
भाजपकडून झालेल्या विश्वासघाताचे विषारी घोट आम्ही पचवले आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांनी आम्हाला चॉकलेट दिले असले तरी जे हलाहल पचवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभी राहत आहे. ते आम्ही कदापि विसरणार नाही. अधिवेशन काळात चॉकलेट वाटप करताना आपण जनतेला ही आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका म्हणजे झाले.
असे ट्विट करत सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.