मुंबई

Ratlam Express Raid : रतलाम एक्स्प्रेसवर छापा! ताडदेव पोलिसांनी ‘लाईव्ह ऑपरेशन’मध्ये पकडले सोन्या-चांदीचे लुटेरे!

मुंबईत 430 ग्रॅम सोन्याची फिल्मी स्टाईल घरफोडी; आरोपी थेट मध्यप्रदेशात पळाले!

मुंबई | मुंबईत मध्यरात्री दोन बंद घरांतील दारे तोडून 430 ग्रॅम सोन्याची लूट करणारे चोरटे थेट मध्यप्रदेशातील रतलामपर्यंत पोहोचले होते. पण पोलिसांनीही ठरवले होते — “ही चोरी जिथून झाली तिथेच थांबणार नाही!” आणि मग सुरू झाला एक थरारक पाठलाग…

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

ताडदेव पोलीस ठाण्यात दिनांक 09 ते 10 जून 2025 या कालावधीत रहिमतबा इमारत क्रमांक 1, साने गुरुजी मार्ग येथील घरफोडी प्रकरणी गु.र.क.कलम 331(4), 305 भा.दं.वि. अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला 227 ग्रॅम सोन्याची चोरी समजली जात होती, मात्र प्रत्यक्षात साक्षीदारांच्या जबाबानुसार एकूण चोरी 430 ग्रॅमपर्यंत पोहोचली.

सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी या लुटारूंचा मार्ग काढला आणि समजले की दोघे रतलाम जंक्शनपर्यंत पळाले आहेत. ताडदेव पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता रेल्वे पोलिस व जीआरपीएफच्या मदतीने थेट प्लॅटफॉर्मवर लाईव्ह ऑपरेशन राबवले आणि दोघा चोरट्यांना चोरीच्या सोन्यासह ताब्यात घेतले.

पकडलेले आरोपी हे परप्रांतीय असून त्यापैकी एकावर यापूर्वीही निर्मल नगर पोलिस ठाण्यात दोन गंभीर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या कारवाईत केवळ माल हस्तगत केला नाही, तर शहरातील वाढत्या घरफोडींच्या मालिकेलाही जोरदार झटका दिला आहे.

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) शैलेश बलकवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकटीकरण (मध्य) राज तिलक रौशन, प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, पोलीस हवालदार अरुण घाटकर,आकाश मांगले, वैभव गिरकर, पोलीस शिपाई विकास चव्हाण, मारुती खेडकर यांनी गुन्हे शाखेच्या इतर पोलीस पथकाच्या मदतीने पार पाडली आहे. यामध्ये रतलाम जंक्शन येथील रेल्वे पोलीस व जी.आर.पी.एफ. पोलीस पथकाचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0