Criminal Reels | गुन्हेगारांचे रिल्स वायरल करणाऱ्यांवर होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’ : पोलीस आयुक्त अमितेश कुमार
- गुन्हेगारांचे उदात्तीकरण पडणार महागात
पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Criminal reels
पुणे शहरात बोकाळलेली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. एका पत्रकार वार्तालापात ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्यासाठी पुणे पोलीस सक्षम असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला. तसेच गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या Criminal Reels रिल्स वर लवकरच ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा सूचक इशारा अमितेश कुमार यांनी दिला.
सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावर कोयता हल्ला, वनराज आंदेकर हत्या, हडपसर येथे फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या, गुलटेकडी येथे तरुणाचा धारदार हत्याराने खून अशा हिंसक गुन्हेगारी घटनांनी ४ दिवसात पुणे शहराला क्राईम कॅपिटल बनविले आहे. हिंसक गुन्हेगारी घटनांना रोखणे व शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अबाधित राखणे गरजेचे बनले आहे.
गुन्हेगारी घटनांची गांभीर्यपूर्ण दखल Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली असून शहरातील गुन्हेगारांच्या कुंडल्या तपासण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. तसेच गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रिल्सवर लवकरच ‘सर्जिकल स्ट्राईक’ होण्याची शक्यता आहे.
माजी पालकमंत्र्यांकडून शहरातील गुंडाला हात जोडून नमस्कार करणे पोलिसांना आवडले नाही.