Pune Police Crime News | गांजा, एमडी विक्रेत्यांची आता खैर नाही : पुणे पोलीसांनी उघडली विशेष मोहीम : विमानतळ, बिबवेवाडी व कोंढव्यात कारवाया
कोंढव्यातून ४० लाखांचा एमडी व गावठी पिस्तूल जप्त
पुणे, दि.7 सप्टेंबर, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Police Crime News
Pune Police Crime News गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरातील गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांजा, एमडी विरोधी विशेष मोहीम हाती घेतली आहे. काल दि. 6 रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून विमानतळ, बिबवेवाडी व कोंढवा येथे कारवाई करण्यात आली. यामध्ये गांजा, एमडी हस्तगत करण्यात आले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, गुन्हे उपायुक्त निखील पिंगळे, सपोआ गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-1 वपोनि उल्हास कदम, पथक-2 वपोनि सुदर्शन गायकवाड यांनी सदर कारवाया केल्या आहेत.
भाग्योदयनगर कोंढवा येथून एम.डी.(मेफेड्रॉन) विक्रेत्याला अटक
सय्यद काझी हाईटस कोंढवा, भाग्योदयनगर लेन नं. 30,कोंढवा पुणे येथे घरातुन एम.डी.(मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अंमली पदार्थ विरोधी पथक-१ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सय्यद काझी हाईटस भाग्योदयनगर,गल्ली नं. 30,कोंढवा पुणे येथे सापळा रचुन समीर शरीफ शेख, वय 22 वर्षे यास ताब्यात घेवुन त्यांची घर झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एकुण किं. रु. 42,26,500/- चा ऐवज त्यामध्ये किं.रु. 40,40,000/- चा 202 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, किं.रु.25,000/- चा एक स्टिलचा गावठी कट्टा, 80,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, असा असलेला ऐवज व एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला असल्याने नमूद आरोपी यांचे विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालु आहे.
वरील नमुद कारवाई गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, उत्तम संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख व कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी केली.
गांजा विक्री करणारा इसम बिबवेवाडी येथून जेरबंद
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा दत्त मंदिराजवळ चैत्रबन सोसायटी,बिबवेवाडी येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी गांजा हा अमली पदार्थ विक्री करीत आहे. सदर ठिकाणी जाऊन पंचासमक्ष कारवाई केली असता,इसम नामे आयुष आनंत शिंदे, वय 20 वर्ष, रा. इंदिरानगर शनी मंदिर मागे बिबवेवाडी पुणे याचे ताब्यात 530 ग्राम गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कलम 8 ( क ), 20(ब )(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
विमानतळ हद्दीत गांजा विक्रेत्यांवर कारवाई
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पथकाला मिळालेल्या बातमी वरून चंदन नगर जुना बस स्टॉप समोर, टी एम ओ रेस्टॉरंट येथील सार्वजनिक रोडवर गांजा हा अमली पदार्थ विक्री करणारा संशयित आरोपी आकाश राजू घोरपडे , वय 23 रा. दत्त मंदिराजवळ खुळेवाडी विमानतळ पुणे याचे ताब्यात 705 ग्राम गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध व त्याला सदर गांजा विक्री करिता मदत करणारा इसम नामें – धनंजय दशरथ पवार रा. सदर यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन एनडीपीएस कलम 8 ( क ), 20(ब )(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील कारवाई ही अमली पदार्थ 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व पोलिस अंमलदार यांनी केली.