Suresh Bankar : छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, ठाकरे गटाच्या नेत्याची भाजपामध्ये घर वापसी

Suresh Bankar Joined BJP : विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उभे असलेले अतुल बनकर यांनी घर वापसी करत भाजपामध्ये प्रवेश
छत्रपती संभाजीनगर :- उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे गळती थांबायचे नाव घेत नाही. छत्रपती संभाजी नगर मधील ठाकरेचे नेते यांनी भाजपामध्ये प्रवेश करत ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात एक मोठा झटका बसला आहे. कोकणातील झटक्यानंतर उद्धव ठाकरे यांना पुन्हा मराठवाड्यातील झटकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने उमेदवार असलेले सुरेश बनकर Suresh Bankar यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करून घरवासी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुरेश बनकर हे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे यांचे साथ धरली होते. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार हे उभे होते आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी बनकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बनकर यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करून घरवापसी केली आहे.विधानसभा निवडणुकीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांचा विजय होऊ नये सुरेश बनकर यांचा पराभव झाला होता.
सुरेश बनकर यांची अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र
आमचा अब्दुल सत्तार यांना विरोध होता, त्यामुळेच मी भारतीय जनता पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेलो होतो. तसेच सत्तार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून आमचा अब्दुल सत्तार यांना असलेला विरोध कायम राहणार असल्याचे बनकर यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार हे हिंदू विरोधी असल्याचा आरोप देखील यावेळी बनकर यांनी केला. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरूनच आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर महायुती असून देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सुरेश बनकर यांनी टीका केली आहे.