क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crime Branch : दरोडेखोर केरळ गॅंग अटकेत,ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 ची कामगिरी

Thane Crime Branch Unit 1 Arrested Burglary Criminal : दरोडाखोर यांनी 30 लाखाची बॅग लंपास केली होती. पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखाच्या घटक-1 पथकाने जेरबंद केले.

ठाणे :- प्रॉमिस इंटरप्राजेस काळबादेवी मुंबई या कंपनीची 30 लाखांची रोकड जेवण घरी जात असताना ठाणे रेल्वे स्थानकावर मोटरसायकल पार्क केलेल्या ठिकाणी चार लोकांनी घेराव केला आणि त्यांच्या हातातील रोकड घेऊन भामटे पसार झाले होते. याप्रकरणी असे मोहम्मद रेहमतुल्ला अन्सारी (43 वय ) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात Nawpada Police Station तक्रार दाखल केली होती. आरोपीने फिर्यादी यांच्या तोंडावर पेपर स्प्रे मारून हातातील बॅग हिसकावुन पळ काढला होता. Thane Crime Branch Unit 1 Arrested Burglary Criminal

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा घटक-1 ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी वारंवार भेट देवून, घटनास्थळावरील तांत्रिक बाबी पडताळून तपासात सातत्य व चिकाटी ठेवून अथक परिश्रम घेवून गुन्हयात आरोपींची ओळख पटवून त्यांना निष्पन्न केले, गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक-1 ठाणे कडे वर्ग करणेबाबत वरिष्ठांचे आदेश प्राप्त केले. त्यानंतर 4 आरोपींचा शोध घेवून त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करून, गुन्हयात जबरीने चोरून नेलेल्या रोख रक्कमेपैकी, 7 लाख 50 हजार रुपये रोख आणि चोरीच्या रक्कमेतुन खरेदी केलेले तीन लाख रुपये किंमतीचे 2 आय फोन असा एकुण 10 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हयात जप्त केलेला आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून, केरळ राज्यातुन त्यांचे एका साथीदाराला अटक केलेली आहे.

सर्व आरोपींची 19 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली असून गुन्हे शाखा घटक-1 ठाणे कडून व अटक आरोपींचे गुन्हयातील इतर साथीदारांचा शोध घेणेसह गुन्हयातील उर्वरीत रोख रक्कम हस्तगत अटक आरोपीकडे गुन्हयाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

पोलिसांना अटक आरोपी व पाहिजे आरोपी हे केरळ राज्यातील असून महाराष्ट्रामध्ये त्यांचे कोणतेही वास्तव्य नाही. ते केवळ गुन्हा करण्यासाठी महाराष्ट्रात येत असून गुन्हा करून ते पुन्हा केरळ येथे पळून जात असलेबाबत माहिती मिळुन आली आली आहे.

अटक आरोपींची नावे
1.विघ्नेश पोकेन के (वय 31)
2.सुहात मोईउद्दीन खोया टी.पी.(वय 31)
3.प्रबुलदेव प्रेमकुमार पुल्लीवता (वय 25)
4.अखिल किष्णा पी. व्ही. (वय 27)
5.सुबिलेश के. बालक्रिश्नन (वय 32)

पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1 ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा घटक-1 ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, विकास सुर्यवशी, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल माने, भरत आरवंदेकर, पोलीस हवालदार धनंजय आहेर, नागराज सोनकडे, प्रशांत निकुंभ, अविनाश पाटील, शब्बीर फरास, गणेश बडगुजर, पोलीस शिपाई मयुर लोखंडे, सागर सुरळकर, बाळू मुकणे व शशिकांत सावंत यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0