पिंपरी चिंचवड

Sunil Shelke Murder Update : आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता एसआयटीकडे; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष पथकाची केली स्थापना

•पावसाळी अधिवेशनातील मागणीनंतर राज्य शासनाचे आदेश; नऊ पिस्तूल आणि 42 काडतुसे जप्त प्रकरणात अतिरिक्त तपास

पिंपरी-चिंचवड :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कथित कटाचा अतिरिक्त आणि सखोल तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे.

काय आहे प्रकरण?

26 जुलै 2023 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई करत सात सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल नऊ पिस्तूल, 42 काडतुसे आणि कोयते जप्त करण्यात आले होते. अटक केलेले आरोपी पुणे, जालना आणि मध्य प्रदेशातील असून, त्यांच्यावर खून, खंडणी, तोडफोड आणि बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अधिवेशनात केली होती मागणी

या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित करत, या कटाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. तेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता पोलीस आयुक्तांनी तातडीने एसआयटीची स्थापना केली आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी माहिती दिली की, “तळेगाव दाभाडेत यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास केला जाईल. तसेच या कटात अन्य कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचाही सखोल तपास केला जाईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0