मुंबई

Sujata Saunik : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र

Ambadas Danve Allegation Shinde Govt :विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रात उल्लेख केला की,राजीनामा देण्याकरिता राज्य सरकारकडून मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांवर दबाव

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहून राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक Sujata Saunik यांच्यावर राजीनामा देण्याकरिता राज्य सरकारकडून दबाव टाकल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.तसे न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटे(गावकर) खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करते आहे. महाराष्ट्रात आपली कारकीर्द गाजवणाऱ्या (भाप्रसे) सनदी अधिकारी व्ही. राधा आणि आय. ए. कुंदन यांनाही अगदी अडगळीत ठेवले आहे. एकीकडे ‘लाडकी बहीण’ म्हणून राज्यात रोज इव्हेंट करायचे आणि दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देणायसाठी षडयंत्र रचायचे, असा कारभार सुरू असल्याचे पत्रात म्हणाले आहे. Maharashtra Political Latest Update

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पत्र

राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या असलेल्या मुख्य सचिव या पदी राज्य शासनाने सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. भारतीय प्रशासकीय सेवतील (IAS) सन 1987 बॅचच्या अधिकारी असून, त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या विविध महत्त्वाच्या पदांवरील कार्यानंतर सन 2024 मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

तथापि, गत काही महिन्यांपासून राज्य सरकार सुजाता सौनिक यांना विविध कारणांनी राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहे. त्यांनी शासनाच्या निर्णयांना विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येत आहे. याशिवाय, राजीनामा दिल्यास त्यांचे पती व राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना महत्त्वाच्या पदी नियुक्ती देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला असून सदरहू प्रस्ताव नाकारल्यास त्यांना कायदेशीर बाबींमध्ये अडकवण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

याचप्रकारे राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात असलेले व्ही. राधा व श्री. आय.ए. कुंदन यांच्या सारख्या अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांना अति महत्वाच्या विभागातून बदली करून त्यांना कमी महत्त्वाच्या विभागामध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यामध्ये राज्य सरकार प्रती असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. सदरहू बाब गंभीर स्वरुपाची आहे.

तरी उक्त प्रकरणी आपण तात्काळ चौकशी करुन प्रशासनाच्या कामात होत असलेला राजकीय हस्तक्षेप टाळून महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय प्रणाली पारदर्शक आणि तटस्थ ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, ही विनंती राज्यपालांकडे दानवे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0