मुंबई

Mumbai Crime News : कांदिवली ; गुंडा आणि त्याच्या चार साथीदारांकडून महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग

•कुख्यात गुंडा हरीश मांडवकर आणि त्याच्या चार साथीदारांच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई :- गणेश विसर्जनाच्या दरम्यान कांदिवली परिसरातील गणेश घाटावर महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुख्यात गुंडा हरीश मांडवकर आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा असे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहे. गुंडांची एवढी मजल वाढली आहे की, जनसमुदायासमोर एका महिलेचा अशाप्रकारे कृत्य केले जाते यावरून गृह खात्याचा गुंडांवर वचक राहिलाय की नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

नेमके काय घडले?
गुंड हरीश मांडवकरसह चार जणांविरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गणपती विसर्जनाच्या रात्री कांदिवलीत विसर्जन स्थळी लाईन तोडून पुढे जाणाऱ्या हरीश मांडवकर आणि त्याच्या साथीदारांना महिला पोलीस अधिकारी यांनी रोखल्याने वाद झाला होता. हरीश मांडवकर आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलिसांना धक्का मारून दादागिरी केली. याप्रकरणी हरीश मांडवकर आणि त्याच्या साथीदारा विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गुंड हरीश मांडवकर याच्यावर अनेक मोठे गुन्हे दाखल आहे. कांदिवली परिसरात गणेश उत्सवाच्या दरम्यान अनेक राजकीय नेत्यांचे बॅनर झळकवून स्वतःचा फोटोही त्यामध्ये लावला होता. तसेच त्यांनी गुंडागिरीनंतर आता राजकीय आश्रय घेण्याच्या हालचाली चालू होत्या. परंतु त्याच्या या कृत्याने पोलीस काय कारवाई करणार? गृह खाते अशा गुंडांना सोडणार का कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0