Subhash Wankhade : माजी खासदार सुभाष वानखेडे या आरोपावरून निलंबित उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी कारवाई
Subhash Wankhade News : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray शिवसेनेच्या वतीने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. Subhash Wankhade Suspended हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे ठाकरे यांनी पाच नेत्यांची हकालपट्टी केली होती. त्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.
याशिवाय वणी विधानसभा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेक, झरी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
4 नोव्हेंबर हा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना आणि यूबीटीसह MVA च्या इतर मित्रपक्षांमध्ये अनेक नेते होते ज्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष अर्ज भरले होते.अशा परिस्थितीत, MVA घटक प्रमुख शरद पवार (NCP SP) आणि उद्धव ठाकरे (शिवसेना UBT) यांनी त्यांच्या बंडखोर नेत्यांना शेवटची संधी देत अल्टिमेटम दिला होता.