महाराष्ट्र
Trending

SSC Board Exam 2025 :  जालन्यात दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर फुटला, दगडफेकीचा प्रकार

SSC Board Exam 2025 : स्थानिक झेरॉक्स सेंटर चालक आणि परीक्षेत न आलेले प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री

जालना :- आज पासून राज्यात दहावी बोर्डाची परीक्षेला सुरुवात झाली आहे. SSC Board Exam 2025 माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कॉफीमुक्त अभियानांतर्गत कडक बंदोबस्त केला असताना राज्य मंडळाच्या अभियानाचा फज्जा उडण्याचा पाहायला मिळाले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसून केवळ दगडफेकीची घटना घडल्याचा दावा केला आहे. स्थानिक झेरॉक्स सेंटर चालकाने परीक्षेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच केंद्राबाहेर मराठी प्रश्नपत्रिका अडीच नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर दहावी मराठीचा पेपर फुटल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या संबंधितच्या बातमीमुळे बदनापूर येथे परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच मराठीची प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर शहरातील झेरॉक्स सेंटवर उत्तरे तयार करून त्याचे सेट तयार करण्यात आले. हे सेट परीक्षा हॉलमधील विद्यार्थ्यांना चोरट्या मार्गाने देण्यात आले.

शिक्षण मंडळाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी या प्रकरणी सांगितले की, संबंधित परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व केंद्र संचालकांकडून तत्काळ अहवाल मागवण्यात आला आहे. स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी तिथे उपस्थित आहेत. या प्रकरणी दोषींवर विभागीय शिक्षण मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, मंडळ मान्यता रद्द करणे आदी योग्य ती कारवाई केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0