SRPF Jawan Suicide : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षारक्षकाची राहत्या घरात आत्महत्या..
•SRPF Prakash Kapade Suicide सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षा मध्ये तैनात असलेल्या जवानाची आत्महत्या
मुंबई :- क्रिकेटचा महान देव समजणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुरक्षारक्षकाचे काम करणारे प्रकाश कापडे यांनी त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. प्रकाश कापडे हे एस. आर. पी. एफ. SRPF Prakash Kapade Suicide मध्ये जवान म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांच्या घरी तैनात होते. गेल्या आठ दिवसापासून ते त्यांच्या जामनेर येथील गणपती नगर मध्ये असलेल्या घरी आले होते. घरातील सर्व व्यक्ती झोपलेल्या असताना त्यांनी पहाटेच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केली. त्यामुळे या घटनेचे चर्चा होत आहे.
प्रकाश कापडे SRPF Prakash Kapade Suicide हे गेल्या पंधरा वर्षापासून एसआरपीएफ मध्ये कार्यरत आहेत. ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुरक्षारक्षकाचे काम करत होते. मात्र, गेल्या आठ दिवसापासून ते जामनेर येथील आपल्या घरी राहत होते. त्यांनी अचानक आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी घटनेचा पंचनामा करून पोलिस अधिक तपास करत आहेत.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील बंगल्यात प्रकाश कापडे हे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून घेतली. त्यावेळी घरातील सर्वजण झोपलेले होते. मात्र अचानक गोळीबाराचा आवाज आल्यानंतर सर्वजण प्रकाश यांच्याकडे धावत गेले. त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. SRPF Prakash Kapade Suicide या प्रकरणी पंचनामा सुरू असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस तपासानंतरच यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल.