मुंबई

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीतून उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

CM Eknath Shinde On Mumai Lok Sabha Election : निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्र पासून तोडणार अशी आवई उठवतात… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे Rahul Shewale यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी चेंबूर येथील घटना गाव आणि धारावी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित लावली‌ होती. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीच्या विकासाबाबत तसेच मुंबई महाराष्ट्र पासून तोडत असण्याची भाषा करणारे सध्या मतासाठी अशी आवई उठवतात आहे.

महाराष्ट्र पासून मुंबई तोडण्याचा आरोप..

निवडणूक जवळ आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून 25 वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले असा सवाल यासमयी उपस्थित केला. जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही असे यावेळी आवर्जून सांगितले. South Mumbai Lok Sabha Election Live Update

खड्डे मुक्त मुंबई..

आपल्या सरकारने दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे सुशोभिकरण होते आहे, आपला दवाखाना सुरु आहे, जागतिक दर्जाचे शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईकर जो बाहेर फेकला आहे, त्याला परत मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करत असल्याचे याप्रसंगी नमूद केले. South Mumbai Lok Sabha Election Live Update

धारावीचा विकास

राहुल शेवाळे यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, अशी ग्वाही दिली. धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला त्याचे हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे यावेळी सांगितले. South Mumbai Lok Sabha Election Live Update

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही…

2014 पूर्वी या शहरातही वारंवार बॉम्बस्फोट व्हायचे. मात्र त्यानंतर एकदाही बॉम्बस्फोट झाला नाही. कारण या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मजबूत नेतृत्व लाभले आहे. मजबूत सरकारसाठी येत्या 20 मेला धनुष्यबाणातून असा मतांचा वर्षाव करा, की मशाल विझली पाहिजे आणि धनुष्यबाण व राहूल शेवाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेच पाहिजेत असे आवाहन केले. South Mumbai Lok Sabha Election Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0