मुंबई

South Mumbai Loksabha : दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीला विरोध, शिवसैनिकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

Rahul Narwekar South Mumbai Loksabha : दक्षिण मुंबई लोकसभेवर खासदार अरविंद सावंत यांचे वर्चस्व, शिंदेंच्या शिवसैनिकांकडून भाजपाच्या उमेदवाराला विरोध

मुंबई :- मुंबईच्या लोकसभेतील सर्वाधिक महत्वाची जागा समजली जाणारी दक्षिण मुंबईचे लोकसभेची जागा या जागेला भाजपाच्या उमेदवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कडाडून विरोध केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटातील शिवसैनिकांनी पत्र लिहून राहुल नार्वेकर यांच्या जागेबाबत विरोध दर्शवला आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाकडून कालच अरविंद सावंत यांचे उमेदवारी जाहीर केली असून आता मी लढत तिरंगी होणार का? ही जागा भाजपाला मिळणार का शिंदे गटाला अद्यापही गुलदस्तातच आहे. तत्पूर्वीच या जागे संदर्भात शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
शिवसैनिकांनी लिहिलेले पत्र काय?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की,

आदरणीय साहेब आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे तमाम हिंदुस्थानाचे स्वप्न आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते यासाठी दिवसरात्र काम करून हे स्वप्न साकार करू, पण हे करत असताना आम्ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अपेक्षित करतो. कारण हा मतदारसंघ मूळ शिवसेनेचा आहे. या मतदारसंघात आतापर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह चालत आलं आहे. या लोकसभा मतदारसंघात कट्टर शिवसैनिकांच्या फौजा आहेत. 2014 आणि 2019 साली या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जिंकत आला आहे.

1989, 1991 आणि 1998 साली दिवंगत नेते मुरली देवरा व त्यांच्यानंतर 2014 आणि 2009 सालापासून खासदार मिलिंद देवर यांचं वर्चस्व राहिला आहे. आता मिलिंद देवर शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे आपल्याला लाखोंचे मताधिक्य देखील मिळू शकते. दक्षिण मुंबईतल्या घराघरात धनुष्यबाण पोहोचला आहे. कट्टर सैनिक या दक्षिण मुंबईतून उमेदवार असेल, तर पक्षाची दक्षिण मुंबईतील ताकद आणखी वाढेल. आपण शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहात. आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्हाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे”, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांनी लिहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0