महाराष्ट्र

Ambadas Danve :शिवसैनिक कायम आणि शिवसैनिक असतो… अंबादास दानवे

Ambadas Danve React On Lok Sabha Election : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शिवसैनिक हा कायम शिवसैनिकच असतो अशी पोस्ट केली.

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून अंबादास दानवे Ambadas Danve काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर फिरत आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी नगरचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी काल पत्रकार परिषद घेत लवकरच ठाकरे यांचे मोठे नेते आमच्या गटात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. लोकसभेपूर्वीच ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून सातत्याने धक्के दिले जात आहे ठाकरे गटाचे एकदम निकटवर्गीय समजले जाणार आहे उद्धव ठाकरे यांचा शिल्लक रवींद्र यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच छत्रपती संभाजी नगर जागेवरून ठाकरे गटात वादाची ठिणगी पडले आहे काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. तर ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर जागरिता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव सध्या चर्चेत आहेत. त्यामुळेच अंबादास दानवे नाराज असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. या सगळं बातमीवर अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अफवा असल्याचे सांगितले जात आहे. अंबादास दानवे यांनी शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो असे म्हणत ठाकरे गटात कायम असल्याचे सांगितले जात आहे.

बाकी सा-या अफवा.. अंबादास दानवे यांची पोस्ट

शिवसैनिक हा कायम शिवसैनिकच असतो.. मी काल,आज, आणि उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबतच असे ठोकून सांगितले आहे. तसेच बाकीच्या बातम्या फिरत आहे ते अफवा असल्याचे अंबादास दानवे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अंबादास दानवे यांना ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी देण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडण्याकरिता अनेक आक्रमक चेहरा म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे पाहिले जात आहे. अधिवेशनात सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याचे काम अंबादास दानवे यांच्याकडून केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0