क्राईम न्यूजमुंबई
Trending

Cyber Fraud News : सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचत तरुणाकडून उकळले आठ लाख!

Cyber Fraud Latest News : नोकरी करणाऱ्या तरुणास ड्रग्ज तस्करीच्या खोट्या आरोपात अडकवले

मुंबई : फसवणुकीचे तंत्र अधिकाधिक गूढ होत चालले असताना सायबर गुन्हेगारांनी एका तरुणावर ‘डिजिटल अरेस्ट’ची टांगती तलवार टाकून तब्बल आठ लाख रुपये लुबाडले. Cyber Fraud News ही घटना काळाचौकी परिसरातील असून सायबर ठगांनी ड्रग्ज तस्करी, बनावट कुरिअर आणि बनवाबनवी खात्यांद्वारे ही शक्कल उभी केली. Mumbai Latest Cyber Crime News

30 वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत कामाला असून, जून 2024 मध्ये त्याला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याच्या नावावर इराणहून आलेले एक संशयास्पद पाकीट अंधेरीतील कुरिअर कार्यालयात अडवले गेले असल्याचा बनाव केला. या पाकिटात अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट आणि विविध डेबिट कार्ड असल्याचे भासवून त्याच्यावर कारवाई होणार असल्याची भीती निर्माण करण्यात आली. Mumbai Latest digital arrest Fraud News

त्यानंतर स्काईप लिंक पाठवून त्याला मुंबई अंमली पदार्थ विभागाशी ‘थेट’ जोडले गेले. स्क्रीन शेअर करायला लावून, बँक खात्यांतील कोट्यवधींचा गैरव्यवहार दाखवत त्याला घाबरविण्यात आले. स्वतः निर्दोष असल्याचा पुनःपुन्हा दावा करूनही, त्याच्याकडून खात्यातील सात लाख सत्तर हजार रुपये आणि एक लाख रुपये गुगल पेने वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले गेले.

घडल्यावर काही वेळातच संपर्क तुटला. धक्का बसलेला तरुण दीर्घकाळ शांत राहिला. अखेर 11 महिन्यांनी त्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0