
Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा – मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई :- राज्यात यावर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावली असून, त्यामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Weather Update
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑरेंज आणि यलो अलर्टही लागू
पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच,छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, नागपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
मुंबईत पावसाचा जोर; नागरिकांची तारांबळ
मुंबईत मान्सून लवकर दाखल झाला असून, पुढील चार दिवसांत (27 ते 30 मे) सतत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले, चेंबूर, वर्सोवा आदी भागांमध्ये 11 मिमी ते 25 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, “मुंबई आणि उपनगरीय भागांत दिवसभर हलका ते मध्यम पाऊस सुरू राहणार आहे.”त्यामुळे प्रवास करताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



