Sion Road Over-Bridge : सायन ओव्हर ब्रिज तोडण्यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
•Sion Over Bridge will be closed for vehicles पोलीस उप आयुक्त वाहतूक समाधान पवार यांनी दिले निर्देश, वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
मुंबई :- मध्य वाहतूक अंतर्गत माटुंगा व कुर्ला वाहतूक विभागातील पुर्व-पश्चिम जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार असल्याने माटुंगा वाहतूक विभागातून बी. ए. रोड वरून सायन ओव्हर ब्रिज पश्चिम वाहिनी मार्गे एल. बी. एस रोड तसेच संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक त्याचप्रमाणे कुर्ला वाहतूक विभागातून एल. बी. एस. रोड तसेच संत रोहिदास रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पुर्व वाहिनीवरून बी. ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही 28 मार्च 2024 रोजीपासून 31 मे 2024 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सदर मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून असे निर्देश समाधान पवार
पोलीस उप आयुक्त, मुख्यालय व मध्य विभाग,वाहतुक, मुंबई यांनी वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी
त्याप्रमाणे वाहतूक व्यवस्थापनाबाबत निर्देश दिले आहे.
सायन ओव्हर ब्रिज पश्चिम वाहिनी बंद केल्याने वळविण्यात आलेले वाहतूक मार्ग
1.डॉ.बी.ए. रोड दक्षिण वाहिनी सायन जंक्शन वरील वाहतुक ही सायन सर्कल, सायन हॉस्पिटल जंक्शन येथून उजवे वळण घेवून, सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून अ) कुर्ला व धारावी कडे कुंभारवाडा जंक्शन येथून उजवे वळण घेवून के. के. कृष्णन मेनन मार्ग (९० फुट) रोडने अशोक मिल गाका उजवे वळण घेवून संत रोहीदास मार्गाने पुढे ही पैलवान नरेश माने चौक येथून डावे वळण घेवून इच्छित स्थळी जातील.
ब) पश्चिम द्रुतगती मार्ग व बांद्रा कडे कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (60 फुट) रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेवून सायन माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून डावे वळण घेवून कलानगर जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जातील.
क) माहिम कड़े 1) कुंभारवाडा जंक्शन येथून डावे वळण घेवून माटुंगा लेबर कॅम्प पुढे टी.एच. कटारीया मार्गे इच्छित स्थळी जातील. किंवा 2) कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (60 फुट) रोडने केमकर चौक येथून डावे वळण घेवून एस. एल. रहेजा मार्गे इच्छित स्थळी जातील.
डॉ. बी.ए. रोड उत्तर वाहिनीवरून येणारी वाहतुक ही सायन हॉस्पिटल जंक्शन येथून डावे वळण घेवून सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जातील.
अ) कुर्ला व धारावी कडे कुंभारवाडा जंक्शन येथून उजवे वळण घेवून के. के. कृष्णन मेनन मार्ग (90 फुट) रोडने अशोक मिल नाका उजवे वळण घेवून संत रोहीदास मार्गाने पुढे ही पैलवान नरेश माने चौक येवून डावे वळण घेवून इच्छित स्थळी जातील.
ब) पश्चिम द्रुतगती मार्ग व बांद्रा कड़े कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (60 फुट) रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेवून सायन माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून डावे वळण घेवून कलानगर जंक्शन मार्गे इछित स्थळी जातील.
क) माहिम कडे 1) कुंभारवाडा जंक्शन येथून डावे वळण घेवून माटुंगा लेबर कॅम्प पुढे टी.एच. कटारीया मार्गे इच्छित स्थळी जातील, किंवा 2) कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग (60 फुट) रोडने केमकर चौक येथून डावे वळण घेवून एस. एल. रहेजा मार्गे इच्छित स्थळी जातील.
सायन ओव्हर ब्रिज पुर्व वाहिनी बंद केल्याने वळविण्यात आलेले वाहतूक मार्ग
3.कुर्ल्याकडून एल. बी. एस. रोड व संत राहिदास मार्गाने सायन स्टेशन जवळून सायन ओव्हर ब्रिज पुर्व वाहिनीने जाणाऱ्या वाहतूकीपैकी हलकी वाहने (LMV) ही पैलवान नरेश माने चौक येथे उजवे वळण घेऊन पुढे संत रोहीदास मार्गे, अशोक मील नाका येथे डावे वळण घेऊन पुढे के. के. कृष्णन मेनन मार्ग (90 फुट) रोडने कुंभार वाडा जंक्शन डावे वळण घेऊन सुलोचना शेटये मार्गाने सायन हॉस्पीटल ब्रिज (कुंभारवाडा ब्रिज) मार्गे त्यांच्या इच्छीत स्थळी जातील.
4.कुर्ल्याकडून एल. बी. एस. रोडने सायन स्टेशन जवळून सायन ओव्हर ब्रिज पुर्व वाहिनीने जाणाऱ्या वाहतूकीपैकी अवजड वाहने (Heavy Vehicle) ही पैलवान नरेश माने चौकापुर्वी धारावी कचरपट्टी
5.जंक्शन सिग्नल येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोड ने पुढे सायन बांद्रा लिंक रोड, धारावी टी जंक्शन येथून इच्छीत स्थळी जातील. पश्चिम द्रुतगती मार्ग व कलानगर जंक्शन कडून सायन बांद्रा लिंक रोडने येणारी वाहतूक धारावी टी.जंक्शन येथून उजवे वळण घेवून केमकर चौक डावे वळण घेवून संत कबीर मार्ग (60 फुट) रोडने कुंभारवाडा जंक्शन सायन हॉस्पीटल ब्रिज (कुंभारवाडा ब्रिज) मार्गे त्यांच्या इच्छीत स्थळी जातील.
सायन ओव्हर ब्रिज दोन्ही वाहिनी बंद केल्याने वळविण्यात आलेल्या वाहतूकीमुळे वाहतूक कोंडी होवू नये म्हणून नो पार्किंग करण्यात आलेले मार्ग
- संत कबीर मार्ग (६० फुट) रोड धारावी ओव्हर ब्रिज (सायन हॉस्पीटल ब्रिज) ते केमकर चौक पर्यत दोन्ही वाहिनी
- सायन माहिम लिंक रोड- टि जंक्शन ते माहिम फाटक पर्यंत दोन्ही वाहिनी
- माटुंगा लेबर कॅम्प-टि.एच. कटारिया मार्ग हा कुंभारवाडा जंक्शन ते शोभा हॉटेल पर्यत दोन्ही वाहिनी
•सुलोचना शेटट्टी मार्ग- सायन हॉस्पीटल जंक्शन ते सायन हॉस्पीटल गेट नं ७ पर्यंत दोन्ही वाहिनी
• भाऊ दाजी रोड- सायन हॉस्पीटल गेट नं. ७ ते रेल्वे ब्रिज दोन्ही वाहिनी
- संत रोहिदास मार्ग-पैलवान नरेश माने चौक ते वाय जंक्शन दोन्ही वाहिनी
- सायन बांद्रा लिंक रोड वाय जंक्शन ते टि जंक्शन दोन्ही वाहिनी
- धारावी डेपो रोड वाय जंक्शन ते कचरपटटी जंक्शन एल. बी. एस. रोड दोन्ही वाहिनी.
- के. के. कृष्णन मेनन मार्ग (९० फुट) रोड- कुंभारवाडा जंक्शन ते अशोक मिल नाका दोन्ही वाहिनी.