सिंधुदुर्ग : 33 हजारांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक आणि कार्यालय अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
![लाचलुचपत प्रतिबंध विभाग,ठाणे](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2024/08/Badlapur-Police-Bribe-News.jpg)
Sindhudurg Bribe News : गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी मागितली 50 हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी अंती 33 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती
सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दोन अधिकाऱ्यांना 33 हजाराची लाच घेताना मंगळवारी (4 फेब्रुवारी) रंगेहाथ अटक करण्यात आली. Sindhudurg Bribe News सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक माणिक भानुदास सांगळे व कार्यालय अधीक्षक उर्मिला महादेव यादव अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.ही कारवाई लाचलुचपत विभाग, सिंधुदुर्ग पथकाने केली.
गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणींसाठी ही लाच घेण्यात आली असून तक्रारदार यांच्याकडे 50 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता (मंगळवारी) जिल्हा उप उपनिबंधक माणिक सांगळे हे तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करत असताना माणिक सांगळे यांनी तेथे उपस्थित राहून त्यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार लाचलुचपतने सापळा रचून पंचासमक्ष दोघांनाही रंगेहाथ अटक केली. दोन्ही आरोपींच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमन अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पवार, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग मुदस्सर पटेल, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग मनोज जिरगे, पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर , रविकांत पालकर,प्रथमेश पोतनीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग ,विशाल नलावडे ,संजय वाघाटे , महिला पोलीस शिपाई समिता क्षिरसागर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी कारवाई करत दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे.