CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी मतदान केले

CM Eknath Shinde News : अजित पवार गटाच्या 25 आमदारांनी मतदान केले
मुंबई :- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी Vidhan Parishad Election सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 124 आमदारांनी मतदान केले आहे. यामध्ये भाजपच्या 19 आमदारांचा समावेश आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या मतांचे योग्य नियोजन केले आहे. आता 11 जागांवर कोण बाजी मारणार आणि कोण हरणार याचा निकाल संध्याकाळपर्यंत कळेल.विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 25 आमदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीवर स्वत: अजित पवार लक्ष ठेवून आहेत. आज दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असून निकालही आज जाहीर होणार आहेत. Vidhan Parishad Election Latest Updates



विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अद्याप तीन आमदारांचे मतदान बाकी आहे. ज्यांनी अद्याप मतदान केले नाही त्यात आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अजित पवार यांच्या नावांचा समावेश आहे. आमदार मतदानासाठी रांगेत उभे आहेत. नाना पटोले, उदय सामंत, दादाजी भुसे, केसी पाडवी रांगेत दिसले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी विधानसभेच्या MLC निवडणुकीत मतदान केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी इतर सदस्यांशीही संवाद साधला. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. Vidhan Parishad Election Latest Updates
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.