Sikkim Landslides : सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत दरड कोसळल्याने राज्यातील पर्यटक अडकले, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे निर्देश

• Sikkim Landslides राज्यातील पर्यटक सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅलीत गेले असताना अचानक दरड कोसळली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांना पर्यटकांना मदत करण्याची दिली निर्देश
मुंबई :- सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना शासनाकडून तातडीची मदत मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मदतकार्याला वेग आला आहे. वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने उद्या (17 जुन) सर्व पर्यटकांना गंगटोकमध्ये आणण्यात येईल. Sikkim Landslides
लॅच्युन्ग व्हॅली येथे रस्त्यावर दरड कोसल्याने अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. ही बातमी समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ त्याची दखल घेत राज्यातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. Sikkim Landslides

या मदतकार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारीदेखील या पर्यटकांशी सतत संपर्कात आहेत. त्यांच्याशिवाय अजून कुणीही सिक्कीममध्ये अडकले असल्यास त्यांनी त्वरित राज्य शासनाला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. Sikkim Landslides