मुंबई

Shreya Kadam : रायगडच्या श्रेया कदमची राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रमासाठी निवड

पनवेल जितिन शेट्टी : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे विकसित भारत प्रकल्पांतर्गत इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या मराठी माध्यमातील विद्यार्थिनी श्रेया मच्छिंद्र कदम हिची निवड झाली आहे.

या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रेयाचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड विभागीय अधिकारी एम. के. कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी व्ही. यू. जगताप, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, बाळासाहेब कारंडे, श्री. गुजर आणि शिक्षक अनिल पाटील उपस्थित होते.

vivek

Recent Posts